भारत बांगलादेश किंवा फ्रान्स नाही; सत्ताबदलाच्या वक्तव्यावरून रिजिजूंचा विरोधकांवर हल्लाबोल
नवी दिल्ली , 18 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी विरोधकांवर आणि भारतविरोधी गटांवर देशात हिंसा व अशांतता भडकवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला. बांगलादेश आणि अलीकडेच फ्रान्समध्ये पाहायला मिळालेल्या घटनांप्रमाणेच भारतातही
भारत बांगलादेश किंवा फ्रान्स नाही’; सत्ताबदलाच्या वक्तव्यावरून रिजिजूंचा विरोधकांवर हल्लाबोल


नवी दिल्ली , 18 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी विरोधकांवर आणि भारतविरोधी गटांवर देशात हिंसा व अशांतता भडकवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला. बांगलादेश आणि अलीकडेच फ्रान्समध्ये पाहायला मिळालेल्या घटनांप्रमाणेच भारतातही आंदोलने आणि दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

‘एक्स’वरील एका पोस्टद्वारे रिजिजू यांनी दावा केला की, काही राजकारणी आणि जनविरोधी घटकांनी एकत्र येऊन तरुणांना सूचना दिली. तसेच रस्त्यांवर हिंसाचार, जाळपोळ आणि लुटालूट घडवून आणण्याचा प्रयत्न केला.रिजिजू म्हणाले, “या धोकादायक कटामागे असलेले लोक हे विसरले की भारत हा बांगलादेश किंवा फ्रान्स नाही. भारतात सत्ताबदल होणे पूर्णपणे शक्य आहे; मात्र तो केवळ निष्पक्ष निवडणुकांच्या माध्यमातूनच होऊ शकतो, जॉर्ज सोरोस यांच्या माध्यमातून नाही.”

आपल्या वक्तव्यासोबत केंद्रीय मंत्र्यांनी एक व्हिडिओही शेअर केला. त्यामध्ये ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आयसा) अध्यक्षा नेहा बोरा आणि ज्येष्ठ अधिवक्ता प्रशांत भूषण हे सत्ताबदलाची बाजू मांडताना दिसत आहेत.दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलने सुरू असताना रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे. या आंदोलनांदरम्यान विरोधी पक्षांचे नेते आणि विद्यार्थी संघटनांनी सत्ताबदलाचा उल्लेख केला होता. त्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

यापूर्वी प्रशांत भूषण यांनी हे आंदोलन म्हणजे विरोधकांकडून सत्ताबदल घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचा सरकारचा दावा फेटाळून लावला होता. भूषण म्हणाले, “सरकार सातत्याने सांगत आहे की, हे विरोधकांचे सत्ताबदलाचे अभियान आहे. मात्र, आम्ही केवळ या देशातील निवडणूकाधारित लोकशाही वाचवण्याचे आवाहन करत आहोत.” ते पुढे म्हणाले, “अशाच प्रकारची क्रूरता सुरू राहिली, तर सत्ताबदल नक्कीच होईल. आम्हा सर्वांना सत्ताबदल हवा आहे. यात चुकीचे काय आहे? सत्ताबदल हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाही अधिकार आहे. सरकारविरोधात असंतोष निर्माण करणे हा काही गुन्हा नाही.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande