केजमधील व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; गुन्हा दाखल
बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। केज येथील प्रसिद्ध व्यापारी प्रमोद निनगुरकर यांचा २७ वर्षीय मुलगा प्रतीक याचे अज्ञाताने अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रतीक आईला बँकेच्या कामासाठी बीडला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र, तो घरी
केज पोलीस ठाणे


बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

केज येथील प्रसिद्ध व्यापारी प्रमोद निनगुरकर यांचा २७ वर्षीय मुलगा प्रतीक याचे अज्ञाताने अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रतीक आईला बँकेच्या कामासाठी बीडला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र, तो घरी न परतल्याने आणि त्याचा मोबाईल बंद येत असल्याने सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. तरीही त्याचा शोध न लागल्याने आई प्रतिभा निनगुरकर यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल राम पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande