सागर जवादे यांच्याकडे औसा सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेची धुरा
लातूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या औसा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सागर जवादे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीसह संघटनेची नूतन तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीच्या क
सागर जवादे


लातूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या औसा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सागर जवादे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीसह संघटनेची नूतन तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षपदी आबासाहेब काळे, उपाध्यक्षपदी मुक्ता गंगथडे, स्वप्नजा जाधव, सुधाकर घोडके व शत्रुघ्न पसारे, सचिवपदी शरद कांबळे, कोषाध्यक्षपदी कृष्णाजी कसबे आणि प्रसिद्धीप्रमुखपदी मारुती वाघमारे यांची निवड झाली.

श्रीदेवी राजमाने यांची महिला तालुका सदस्यपदी, तर चंद्रकला लातुरे व मीना घायाळ यांची महिला प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात

आली. सहकारी अडीअडचणी कर्मचाऱ्यांच्या सोडविण्यासाठीची तत्परता आणि शेतकऱ्यांशी असलेला थेट संपर्क या पार्श्वभूमीवर जवादे

यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande