बांगलादेश दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या कसोटी संघात बदल, शामर स्प्रिंगरचा समावेश
नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर (हिं.स.) : वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आपल्या संघात बदल केले आहेत. वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू क्रिकेटपटू कीमो पॉल वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे मायदेशी परतणार आहे. त्याच्या जा
शामर स्प्रिंगर


नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर (हिं.स.) : वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आपल्या संघात बदल केले आहेत. वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू क्रिकेटपटू कीमो पॉल वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे मायदेशी परतणार आहे. त्याच्या जागी शामर स्प्रिंगरचा समावेश करण्यात आला आहे.

स्प्रिंगरने वेस्ट इंडिजसाठी तीन एकदिवसीय आणि १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पण त्याने अद्याप कसोटी पदार्पण केलेले नाही. त्याने २३ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये ३२.५९ च्या सरासरीने १,०४३ धावा केल्या आहेत आणि २७.८७ च्या सरासरीने ५८ बळी घेतले आहेत.

स्प्रिंगरने २०२६ च्या वेस्ट इंडिज चॅम्पियनशिपमध्ये बार्बाडोससाठी फलंदाजीत चांगली कामगिरी केली होती, जिथे त्याने चार सामन्यांमध्ये ५०.२० च्या सरासरीने २५१ धावा केल्या होत्या. पण, त्याची गोलंदाजीची कामगिरी तुलनेने सामान्य होती, त्याने आठ डावांमध्ये ४२ च्या सरासरीने सात बळी घेतले.

क्रिकेट वेस्ट इंडिजने कळवले की, कीमो पॉलच्या संभाव्य बदली क्रिकेटपटू म्हणून ओ.जे. शील्ड्स आणि नायल स्मिथ यांचाही विचार करण्यात आला होता, पण दुखापतींमुळे ते निवड शर्यतीतून बाहेर पडले.

या दौऱ्यावर वेस्ट इंडिज संघात नियमित व्हाईट-बॉल कर्णधार शाई होप देखील नसेल. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला कामाच्या ताणाचे व्यवस्थापन (वर्कलोड मॅनेजमेंट) करण्यासाठी संघातून वगळण्यात आले आहे. सुरुवातीला जोसेफच्या जागी कीमो पॉलचा संघात समावेश करण्यात आला होता.

स्प्रिंगर आणि पॉल दोघेही भारताविरुद्धच्या वेस्ट इंडिजच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत सहभागी होते. बंगळूरु येथे पावसामुळे पाचवा टी-२० सामना रद्द झाला. वेस्ट इंडिजने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १-२ ने गमावली, तर पाच सामन्यांची टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

वेस्ट इंडिज संघ २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान ढाका येथे तीन दिवसीय सराव सामना खेळेल. त्यानंतर पहिला कसोटी सामना २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान मिरपूर येथे, तर दुसरा कसोटी सामना ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान सिल्हेट येथे खेळला जाईल.

बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा सुधारित संघ:

रॉस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन (उपकर्णधार), जोशुआ बिशप, जॉन कॅम्पबेल, टेग्नारिन चंदरपॉल, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, कावेम हॉज, अमीर जांगू (यष्टीरक्षक), शमर जोसेफ, ब्रँडन किंग, केमार रोच, जेडन सील्स, शमर स्प्रिंगर आणि केविन विकहॅम.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande