ऊसदराचा तिढा गुरुवारी सुटणार; केजमधील आंदोलन तात्पुरते स्थगित
बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। केजमधील धनेगाव फाटा येथे बजरंग सोनवणे आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीनंतर, ऊसदर व थकीत बिलांसाठी सुरू असलेले आंदोलन गुरुवारपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला
बजरंग सोनवणे


बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

केजमधील धनेगाव फाटा येथे बजरंग सोनवणे आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीनंतर, ऊसदर व थकीत बिलांसाठी सुरू असलेले आंदोलन गुरुवारपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला असून, गुरुवारी ते अधिकृत घोषणा करतील. या आश्वासनामुळे शेतकऱ्यांनी संप थांबवला आहे. तसेच, कारखान्यांनी जाहीर केलेल्या तीन हजार रुपये प्रतिटन दरात वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अद्याप कायम आहे. गुरुवारी समाधानकारक निर्णय न झाल्यास प्रशासनाला तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल आणि उग्र आंदोलन छेडले जाईल, असा परखड इशारा देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande