चांदीचे दर गडगडले; किलोमागे १३,२०० रुपयांची घसरण
नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। देशांतर्गत सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. शुक्रवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात चांदीच्या किमतीत प्रतिकिलो १२,७०० रुपयांपासून ते १३,२०० रुपयांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली. चांदीच्या दरात झालेल्
Bullion Market Silver Price


नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। देशांतर्गत सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. शुक्रवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात चांदीच्या किमतीत प्रतिकिलो १२,७०० रुपयांपासून ते १३,२०० रुपयांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली. चांदीच्या दरात झालेल्या या मोठ्या घसरणीमुळे देशाच्या विविध भागांत आज चांदी प्रतिकिलो २,२६,८०० रुपयांपासून ते २,३२,००० रुपयांपर्यंत विकली जात आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या दरात प्रतिकिलो १२,९०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा भाव प्रतिकिलो २,२७,००० रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई, अहमदाबाद आणि कोलकाता येथे चांदीचा भाव प्रतिकिलो २,२६,८०० रुपये आहे. तर जयपूर, सुरत आणि पुणे येथे चांदीचा भाव प्रतिकिलो २,२७,१०० रुपयांच्या पातळीवर आहे.

बंगळुरूमध्ये चांदीचा भाव प्रतिकिलो २,२७,३०० रुपये, तर पाटणा आणि भुवनेश्वर येथे प्रतिकिलो २,२६,९०० रुपये आहे. याशिवाय हैदराबादमध्ये चांदीच्या किमतीत प्रतिकिलो १३,१०० रुपयांची घसरण झाली असून, येथे चांदी प्रतिकिलो २,३१,७०० रुपयांना विकली जात आहे. शुक्रवारी देशात चांदीचा सर्वाधिक भाव चेन्नईमध्ये आहे. येथे चांदी प्रतिकिलो १३,२०० रुपयांनी स्वस्त होऊन २,३२,००० रुपयांवर आली आहे.

मार्केट एक्स्पर्ट मयंक मोहन यांनी सांगितले की, पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावामुळे बाजारातील सर्व समीकरणे बदलली आहेत. बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असून, त्यामुळे सर्वात सुरक्षित इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीसारख्या धातूंच्या किमतींमध्येही आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने चढ-उतार होत आहेत.

मयंक मोहन यांच्या मते, भारत आपल्या गरजेच्या सुमारे ८५ टक्के सोने आंतरराष्ट्रीय बाजारातून खरेदी करतो. त्याचप्रमाणे चांदीची मागणी पूर्ण करण्यासाठीही सुमारे ८० टक्के आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या कोणत्याही चढ-उताराचा थेट परिणाम भारतीय बाजारातील किमतींवर होतो. गेल्या एका आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत प्रतिऔंस ६५.५० डॉलरवरून घसरून ६१.०७ डॉलरवर आली आहे. या घसरणीमुळेच भारतीय बाजारातही चांदी स्वस्त झाली आहे.

मयंक मोहन यांच्या म्हणण्यानुसार, जिओ-पॉलिटिकल टेन्शनमुळे सध्या चांदीच्या इंडस्ट्रियल डिमांडमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र, ही परिस्थिती दीर्घकाळ टिकू शकत नाही. सामान्य गरजा पूर्ण करण्यासाठीही युद्धात सहभागी असलेल्या पक्षांना औद्योगिक कामकाजाला गती देणे भाग पडेल. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास चांदीच्या किमती पुन्हा वेगाने वाढू शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande