गांधी जयंतीनिमित्त स्टॉक आणि कमोडिटी एक्सचेंजला सुट्टी; ५ ऑक्टोबरपासून नियमित व्यवहार
नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। गांधी जयंतीनिमित्त देशांतर्गत शेअर बाजारात आज सुट्टी आहे. गांधी जयंतीच्या सुट्टीनंतर शनिवार आणि त्यानंतर रविवार असल्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) मध्ये साप्ताहिक सुट्टी राहणार आ
Stock Market Gandhi Jayanti Holiday


नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। गांधी जयंतीनिमित्त देशांतर्गत शेअर बाजारात आज सुट्टी आहे. गांधी जयंतीच्या सुट्टीनंतर शनिवार आणि त्यानंतर रविवार असल्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) मध्ये साप्ताहिक सुट्टी राहणार आहे. त्यामुळे आता शेअर बाजार तीन दिवसांनंतर म्हणजेच ५ ऑक्टोबरला खुले होईल आणि त्याच दिवशी नियमित व्यवहार सुरू होतील.

बीएसई आणि एनएसईप्रमाणेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) मध्येही आज गांधी जयंतीनिमित्त पूर्ण सुट्टी आहे. म्हणजेच आज कमोडिटी एक्सचेंजमध्ये दिवस आणि संध्याकाळच्या दोन्ही सत्रांत कोणताही व्यवहार होणार नाही. या सुट्टीमुळे स्टॉक एक्सचेंजप्रमाणेच कमोडिटी एक्सचेंजमध्येही सलग तीन दिवसांची सुट्टी राहणार आहे. त्यानंतर कमोडिटी एक्सचेंजमध्येही ५ ऑक्टोबरपासून नियमित व्यवहार सुरू होतील.

स्टॉक एक्सचेंजकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गांधी जयंतीची सुट्टी असल्याने बीएसईमध्ये इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंट्स, न्यू डेट सेगमेंट- रिपोर्टिंग, सेटलमेंट अँड ट्रेडिंग प्लॅटफॉर्म (एनडीएस-आरएसटी), ट्राय पार्टी रेपो या सर्वांसाठी ट्रेडिंग हॉलिडे राहणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्ट्स (ईजीआर), कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंटमध्येही दिवसाच्या दोन्ही सत्रांत व्यवहार होणार नाहीत.

त्याचप्रमाणे एनएसईमध्येही गांधी जयंतीच्या सुट्टीमुळे इक्विटीज, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, कॉर्पोरेट बॉन्ड्स, न्यू डेट सेगमेंट्स, निगोशिएटेड ट्रेड रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म, म्युच्युअल फंड्स, सिक्युरिटी लेंडिंग अँड बॉरोइंग स्कीम्स, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह्ज या सर्व सेगमेंट्समध्ये सुट्टी राहणार आहे.

स्टॉक मार्केटच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यात आज गांधी जयंतीच्या सुट्टीनंतर २० ऑक्टोबरला स्टॉक मार्केटमध्ये दसऱ्याची सुट्टी असेल, तर १० नोव्हेंबरला बळीप्रतिपदेनिमित्त स्टॉक मार्केटमध्ये सुट्टी राहणार आहे. नोव्हेंबर महिन्यात २४ तारखेला श्री गुरु नानक देव गुरु पर्वाची सुट्टी असेल. त्याचप्रमाणे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये २५ तारखेला ख्रिसमसची सुट्टी राहणार आहे.

यावर्षी दिवाळी ८ नोव्हेंबरला रविवारी साजरी केली जाणार आहे. शनिवार आणि रविवार असल्यामुळे हा दिवस स्टॉक मार्केटच्या हॉलिडे कॅलेंडरमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. दिवाळीच्या दिवशी रविवार असूनही स्टॉक मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. मात्र, मुहूर्त ट्रेडिंगची वेळ नंतर जाहीर केली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande