
नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)च्या तीन दिवसीय द्वैमासिक मौद्रिक धोरण समिती (एमपीसी)ची आढावा बैठक ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान मुंबईत होणार आहे. आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, यावेळी धोरणात्मक व्याजदर असलेल्या रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय एमपीसीची तीन दिवसीय आढावा बैठक होणार असून, त्यात महागाई, आर्थिक घडामोडी आणि धोरणात्मक व्याजदर (रेपो रेट) यांच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मौद्रिक धोरणातील निर्णयांची माहिती देतील. आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, यावेळी आरबीआय रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते.
ब्रोकरेज फर्म नोमुराने ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या मौद्रिक आढावा बैठकीत धोरणात्मक व्याजदर असलेल्या रेपो रेटमध्ये प्रत्येकी ०.२५ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आरबीआयने ऑगस्टमध्ये झालेल्या मागील एमपीसी बैठकीत रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule