सीमा बंद करा, अन्यथा युरोपचा अंत होईल; ट्रम्प यांचा फ्रान्सला इशारा
वॉशिंग्टन, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पुन्हा एकदा फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या निदर्शनांना आणि हिंसाचाराला स्थलांतरासाठी जबाबदार धरले. युरोप आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
सीमा बंद करा, अन्यथा युरोपचा अंत होईल; ट्रम्प यांचा फ्रान्सला इशारा


वॉशिंग्टन, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पुन्हा एकदा फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या निदर्शनांना आणि हिंसाचाराला स्थलांतरासाठी जबाबदार धरले. युरोप आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या देशांच्या सीमा अधिक सुरक्षित आणि कडक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ट्रम्प म्हणाले, “फ्रान्समध्ये जे काही घडत आहे, त्याचा संबंध स्थलांतराशी आहे. शाळांशी किंवा इतर कोणत्याही गोष्टीशी त्याचा संबंध नाही.” एक दिवस आधी केलेल्या विधानाचाच त्यांनी पुनरुच्चार केला. त्यावेळी ते म्हणाले होते, “हा स्थलांतराचा प्रश्न आहे. मी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आपल्या देशाच्या सीमा बंद करण्यास सांगितले आहे.”

पॅरिससह फ्रान्समधील इतर शहरांमध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात निदर्शने झाली. मात्र, पुढे या आंदोलनांना हिंसक वळण लागले आणि गेल्या काही वर्षांतील फ्रान्समधील सर्वाधिक तीव्र रस्त्यावरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये त्यांचे रूपांतर झाले.

मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले, “तुम्ही फ्रान्समध्ये एक मोठी चूक करत आहात. तुम्ही जगभरातील लोकांना देशात प्रवेश देत आहात. संपूर्ण जगच फ्रान्समध्ये येत आहे. लवकरच पॅरिस हे मुस्लिम शहर बनेल.”ते पुढे म्हणाले, “युरोपने आपल्या सीमा बंद केल्या नाहीत आणि गुन्हेगारांना देशाबाहेर काढले नाही, तर युरोपचा अंत होईल.”

फ्रान्समध्ये महागाई, वाढता खर्च आणि शाळांची दयनीय अवस्था यांविरोधात सुरू झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्यानंतर सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, अनेक शहरांमध्ये तोडफोड आणि लुटमारीच्या घटना घडल्यानंतर पंतप्रधान सेबॅस्टियन लेकॉर्नू यांच्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनाने पॅरिस, लिल आणि नीससह अनेक शहरांतील संवेदनशील भागांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली.

पंतप्रधान लेकॉर्नू यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्याची शक्यता फेटाळली. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर आणीबाणी जाहीर करण्याचे संकेत त्यांनी दिले. त्यांनी आंदोलकांना लुटारू आणि दंगलखोर असे संबोधले. तसेच, दोषींना ओळखण्यासाठी २०० हून अधिक तपास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande