हुतींच्या हल्ल्यांमुळे सौदीच्या युवराजांच्या बंकरयुक्त महालाची सुरक्षा वाढवली; आलिशान जीवनशैली पुन्हा चर्चेत
रियाध, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांना सध्या बंकरची सुविधा असलेल्या महालात आश्रय घेण्याची वेळ आली आहे. वृत्तानुसार, येमेनमधील हुती बंडखोरांनी रियाधसह सौदी अरेबियातील अनेक ठिकाणांवरील हल्ले तीव्र केले आहेत. त्यामुळे
हुतींच्या हल्ल्यांमुळे सौदीच्या युवराजांच्या बंकरयुक्त महालाची सुरक्षा वाढवली; आलिशान जीवनशैली पुन्हा चर्चेत


रियाध, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांना सध्या बंकरची सुविधा असलेल्या महालात आश्रय घेण्याची वेळ आली आहे. वृत्तानुसार, येमेनमधील हुती बंडखोरांनी रियाधसह सौदी अरेबियातील अनेक ठिकाणांवरील हल्ले तीव्र केले आहेत. त्यामुळे बंकरची सुविधा असलेल्या महालातील त्यांची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. या संकटामुळे सलमान यांच्या आलिशान जीवनशैलीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. हेलिपॅड असलेली आलिशान नौका आणि आयफोनवरून नियंत्रित करता येणारे कारंजे अशा अनेक अत्याधुनिक सुविधांचा त्यांच्या ऐश्वर्यपूर्ण जीवनशैलीत समावेश आहे.

२०१५ मध्ये सुट्टीसाठी फ्रान्सला गेले असताना सलमान यांनी ‘सेरेन’ ही आलिशान नौका पाहिली. पहिल्याच नजरेत त्यांना ती आवडली. या नौकेवर अवघा अर्धा तास घालवल्यानंतर त्यांनी तिच्या मूळ किमतीच्या दुप्पट म्हणजेच सुमारे ५,४७२ कोटी रुपये देऊन ती खरेदी केली.या नौकेवर 2 हेलिपॅड असून, पाण्याखालील दृश्ये पाहण्यासाठी खास कक्षही आहे.सलमान यांनी २०१५ मध्ये फ्रान्समधील व्हर्साय येथे सुमारे २,८४८ कोटी रुपये खर्चून एक भव्य महाल खरेदी केला होता. त्या वेळी हा जगातील सर्वात महागडा घर म्हणून ओळखला जात होता. ५७ एकर परिसरात पसरलेला हा महाल बाहेरून सतराव्या शतकातील राजवाड्यासारखा दिसतो. मात्र, आतमध्ये आलिशान सजावट, चित्रपटगृह आणि जलतरण तलाव अशा अनेक सुविधा आहेत.

महालाच्या परिसरात पाण्याने वेढलेला एक खास कक्ष आहे. या कक्षात बसून वरून पोहत जाणारे मासे पाहता येतात. येथील कारंजे, प्रकाशयोजना आणि वातानुकूलन यंत्रणा आयफोनच्या माध्यमातून नियंत्रित करता येतात.सौदी अरेबियातील निओम येथे लाल समुद्राच्या किनाऱ्यावर सलमान यांचा आणखी एक भव्य महाल आहे. या महालात खासगी समुद्रकिनारा, विस्तीर्ण उद्याने, गोल्फ मैदान आणि हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी तब्बल १० हेलिपॅड आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande