सिलिकॉन व्हॅली ओपन-अनाहत सिंगची ८ वेळची विश्वविजेती एल शेरबिनीवर मात
कॅलिफोर्निया (अमेरिका), २२ ऑक्टोबर (हिं.स.) भारतीय स्क्वॅशपटू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती अनाहत सिंग हिने आपल्या कारकिर्दीतील सर्वात नेत्रदीपक विजयांपैकी एक नोंदवला आहे. ''सिलिकॉन व्हॅली ओपन'' स्क्वॅश स्पर्धेत तिने इजिप्तच्या आठ वेळा
अनाहत सिंग


कॅलिफोर्निया (अमेरिका), २२ ऑक्टोबर (हिं.स.) भारतीय स्क्वॅशपटू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती अनाहत सिंग हिने आपल्या कारकिर्दीतील सर्वात नेत्रदीपक विजयांपैकी एक नोंदवला आहे. 'सिलिकॉन व्हॅली ओपन' स्क्वॅश स्पर्धेत तिने इजिप्तच्या आठ वेळा विश्वविजेती ठरलेल्या नूर एल शेरबिनीचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या अनाहतने, आठ वेळा विश्वविजेती असलेल्या एल शेरबिनीचा ३-० (११-८, ११-८, ११-७) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा सामना अवघ्या ३० मिनिटांत संपला.

सामन्यानंतर अनाहत म्हणाली, मी तिचे प्रत्येक सामने पाहून मोठी झाले आहे. मी तिचा आदर करते आणि ती सर्व स्क्वॅशपटूंसाठी एक प्रेरणास्थान आहे. तिने आपल्या कारकिर्दीत ज्या गोष्टी साध्य केल्या आहेत, त्या प्रत्येकाला मिळवायच्या असतात. तिच्यासोबत पहिल्यांदाच कोर्टवर उतरताना असा निकाल लागेल, असे मला वाटले नव्हते. मला वाटले होते की, खेळात स्थिरावण्यासाठी आणि तिच्याविरुद्ध कशी रणनीती आखायची हे समजून घेण्यासाठी मला थोडा वेळ लागेल. पण, माझी योजना अगदी यशस्वी ठरली.

आशियाई क्रीडा स्पर्धेतून अनाहतने ऐतिहासिक रौप्य पदक पटकावले होते. या स्पर्धेत स्क्वॅशच्या एकेरी प्रकारात रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. याशिवाय, तिने महिला संघाला 'आयची-नागोया' येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक मिळवून देण्यातही मोलाची भूमिका बजावली होती.

'आयची-नागोया' येथील आशियाई क्रीडा स्पर्धेतून परतलेल्या आठ सदस्यीय भारतीय स्क्वॅश पथकाने एकूण पाच पदके (दोन रौप्य आणि तीन कांस्य) जिंकली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande