तलवारबाजीत केतकी चवळेची राज्यस्तरावर झेप
लातूर, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी केतकी विजयकुमार चवळे हिने १९ वर्षांखालील शालेय विभागीय तलवारबाजी स्पर्धेत वैयक्तिक तृतीय क्रमांक मिळवला. या यशामुळे तिची शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्
केतकी चवळे


लातूर, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी केतकी विजयकुमार चवळे हिने १९ वर्षांखालील शालेय विभागीय तलवारबाजी स्पर्धेत वैयक्तिक तृतीय क्रमांक मिळवला. या यशामुळे तिची शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अंतर्गत धाराशिव येथे ही स्पर्धा झाली. केतकीला क्रीडा संचालक प्रा. सतीश मुंढे आणि प्रा. रमजू शेख यांचे मार्गदर्शन लाभले. केतकीच्या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे संस्थेचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande