रत्नागिरी : विधी महाविद्यालयाच्या मार्तंड झोरेला तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक
रत्नागिरी, 24 ऑक्टोबर (हिं.स.) । मुंबई विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी मार्तंड झोरे याने तलवारबाजी स्पर्धेत फॉइल क्रीडाप्रकारात सुवर्णपदक पटक
रत्नागिरी : विधी महाविद्यालयाच्या मार्तंड झोरेला तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक


रत्नागिरी, 24 ऑक्टोबर (हिं.स.) । मुंबई विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी मार्तंड झोरे याने तलवारबाजी स्पर्धेत फॉइल क्रीडाप्रकारात सुवर्णपदक पटकावले.

मुंबईत सोफिया कॉलेज फॉर वुमेन येथे ही स्पर्धा झाली. मुंबई विद्यापीठाच्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीतदेखील त्याने फॉइल प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करून दुहेरी यश संपादन केले.

मार्तंड झोरे याची कामगिरी केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित नसून कला क्षेत्रातही त्याने आपल्या प्रतिभेची छाप पाडली आहे. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत त्याने ऑन दि स्पॉट पेंटिंग आणि पोस्टर पेंटिंग या दोन्ही कला प्रकारांत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. अशा प्रकारे क्रीडा आणि कला या दोन्ही क्षेत्रांत सातत्यपूर्ण यश मिळवून त्याने आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण केली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशीष बर्वे आणि महाविद्यालयाच्या क्रीडा प्रमुख डॉ. संयोगिता सासने यांनी मार्तंडचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande