आशा व गटप्रवर्तक सेविका संघाचे कोल्हापूर जिल्हा अधिवेशन संपन्न
कोल्हापूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। आशा व गटप्रवर्तक सेविका संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ, कोल्हापूर जिल्हा यांचे जिल्हा अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या अधिवेशनात आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यांचे
आशा व गटप्रवर्तक सेविका संघ अधिवेशन


कोल्हापूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। आशा व गटप्रवर्तक सेविका संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ, कोल्हापूर जिल्हा यांचे जिल्हा अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या अधिवेशनात आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यांचे प्रलंबित मानधन, मानधनवाढ, कामाचा योग्य मोबदला, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी तसेच आरोग्यविषयक सुविधा यांसारख्या प्रश्नांवर शासन व प्रशासनाकडे संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या अधिवेशनात आगामी सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी सौ. सुरेखा राजेशिर्के, तर जिल्हा सचिवपदी सौ. सरिता मोरे यांची निवड करण्यात आली.

या निवड प्रक्रियेच्या वेळी भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री किरण मिलगीरजी, प्रदेश कोषाध्यक्ष बाळासाहेब कांबळेजी, अखिल भारतीय आशा कर्मचारी महासंघ, संलग्न भारतीय मजदूर संघाच्या सचिव ज्योती तावरे, भारतीय मजदूर संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तेजेश मडिवाळ आणि जिल्हा सचिव प्रविण जाधव उपस्थित होते.

नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सुरेखा राजेशिर्के व जिल्हा सचिव सरिता मोरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी तीन वर्षांत संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासोबतच आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावीपणे कार्य करण्यात येईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande