
चंद्रपूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील भेंडाळा येथे एका महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. दरम्यान मागील २४ तासात वन्यजीव हल्ल्यात दोन जणांचा बळी गेला आहे.
सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा येथे वाघाच्या हल्ल्यात ४० वर्षीय महिला शेतकरी प्रेमिला पुंडलिक महाडोळे यांचा मृत्यू झाला. शेतात काम करत असताना वाघाने केलेल्या या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृतदेहच शेतात आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि भीतीची लाट पसरली आहे. चालू वर्षात मानव वन्यजीव संघर्षात हा ३५ वा बळी आहे. गेल्या अवघ्या दोन दिवसांत सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचे प्राण गेल्याने ग्रामीण भागात संतापाची व दहशतीची लाट उसळली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव