
बीड, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्हाधिकारी, विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली केज तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, मंडळ अधिकारी, सरपंच तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई व संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी टंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन, विभागांमधील समन्वय आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis