नाशिक आर्टिलरी सेंटरला माजी सैनिकांचा भव्य मेळावा आयोजित
नाशिक, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड येथे माजी सैनिकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. देशसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्
Grand gathering of ex-


Grand gathering of ex-


नाशिक, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड येथे माजी सैनिकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. देशसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे तसेच त्यांच्या अमूल्य सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.

या मेळाव्याला लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे वीर नारींचा सन्मान, व्हीलचेअर आणि श्रवणयंत्रांचे वितरण, अनाथ मुलांचा तसेच देशसेवेत सर्वोच्च बलिदान दिलेल्या सैनिकांच्या पाल्यांचा गौरव आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिकांचा सत्कार. या सन्मान सोहळ्याद्वारे सेवा, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेची मूल्ये आजही जपणाऱ्या वीरांचा यथोचित गौरव करण्यात आला.

माजी सैनिकांना विविध कल्याणकारी आणि सहाय्यक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्यात सर्वसमावेशक व्यवस्था करण्यात आली होती. निवृत्तिवेतनविषयक प्रश्न व तक्रार निवारण, आधार कार्ड आणि स्पर्श प्रणालीसंदर्भातील सहाय्य, वैद्यकीय सेवा तसेच माजी सैनिकांसाठीच्या इतर सुविधांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले होते. त्यामुळे अनेक समस्यांचे जागीच निराकरण करणे शक्य झाले.

विविध शासकीय विभागांचे आणि संबंधित संस्थांचे प्रतिनिधी माजी सैनिकांशी थेट संवाद साधत होते. त्यांच्या वैयक्तिक तक्रारींचे निराकरण करण्यासह त्यांना पात्र लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक मदत करण्यात आली. विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा आणि माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना वेळेत सहाय्य उपलब्ध व्हावे, यावर विशेष भर देण्यात आला. धुळे आणि नाशिक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांच्या (ZSWO) वतीने राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्यही प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, जीओसी, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र यांनी राष्ट्रसेवेसाठी माजी सैनिकांनी दिलेल्या निःस्वार्थ योगदानाबद्दल आणि केलेल्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कल्याण, सन्मान आणि सर्वांगीण हित जपण्यासाठी भारतीय लष्कर कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

या मेळाव्याने माजी सैनिकांप्रती भारतीय लष्कराची कायमस्वरूपी बांधिलकी आणि ‘एकदा सैनिक, सदैव सैनिक’ या तत्त्वाचा पुनरुच्चार केला. माजी सैनिकांशी असलेले नाते अधिक दृढ ठेवण्याचा तसेच त्यांच्या समस्या संवेदनशीलतेने, तत्परतेने आणि प्राधान्याने सोडविण्याचा भारतीय सशस्त्र दलांचा निर्धारही या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.

देशसेवेत अभिमानाने उभे राहिलेल्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा मेळावा एक यथोचित सन्मान सोहळा ठरला. त्यांची समर्पित सेवा, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा आजही भावी पिढ्यांना प्रेरणा देत आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande