अमरावती : बाळविक्री प्रकरणात डॉ. दांडगेची कारागृहात रवानगी; भोजने दाम्पत्य अद्यापही पसार
अमरावती, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। गर्भवती अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिचे बाळ विकल्याप्रकरणी अटक डॉ. मयूर दांडगे याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्याची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांचे बयान नोंदविले असून
अमरावती : बाळविक्री प्रकरणात डॉ. दांडगेची कारागृहात रवानगी; भोजने दाम्पत्य अद्यापही पसार


अमरावती, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। गर्भवती अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिचे बाळ विकल्याप्रकरणी अटक डॉ. मयूर दांडगे याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्याची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांचे बयान नोंदविले असून डॉ. भोजने दाम्पत्य अद्यापही पसार आहे.

गर्भवती अल्पवयीन मुलीची प्रसूती केल्यानंतर तिचे बाळ ३ लाख ५० हजार रुपयांत विकण्याचा कट रचल्या प्रकरणात पोलिसांनी डॉ. वैशाली भोजनेचे मॅटर्निटी व नर्सिंग होम सील करुन वडाळी परिसरातील डॉ. मयूर दांडगे याच्या रुग्णालयाची संपूर्ण पाहणी व मंगळवारी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला प्रथम दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी पोलीस कोठडी संपुष्टात आल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

डॉ. वैशाली भोजने व तीचा पती घटनेच्या दिवसापासून शहरातून पसार असल्याने पोलीस त्यांच्या शोधात आहे. मात्र अद्यापही पोलिसांना त्यांचा सुगावा लागलेला नाही. या प्रकरणात पोलिसांनी पीडित व तिचा प्रियकर, नातेवाईक व दोन महिला अशा एकूण आठ लोकांचे बयाण नोंदवीले आहे. बयाणावरून डॉ. वैशाली भोजने यांनी खरच बाळ विकण्याचा कट रचला होता का, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकल्याने पोलीस या प्रकरणात प्रत्येकांची कसून चौकशी करीत आहे. लालखडी, शिराळा पुसदा या ठिकाणी पोलिसांनी डॉ. वैशाली भोजने व तिच्या पतीचा शोध घेतला, परंतु पोलिसांना मिळाले नाही.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande