राष्ट्रपतींना तपोवन भेटीचे निमंत्रण
नाशिक, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत असताना, शहराच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे प्रतीक असलेल्या तपोवनाला भेट द्यावी, असे सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे. यासंदर्भात कॉ. राजू देसले, कॉ
राष्ट्रपतींना तपोवन भेटीचे निमंत्रण


नाशिक, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।

- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत असताना, शहराच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे प्रतीक असलेल्या तपोवनाला भेट द्यावी, असे सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे. यासंदर्भात कॉ. राजू देसले, कॉ. मनोहर पगारे, कॉ. प्राजक्ता कापडणे आदींनी राष्ट्रपती भवनाकडे निवेदन पाठविले आहे.

नाशिक हे गोदावरीच्या तीरावर वसलेले असून, शहराला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच नैसर्गिक वारसा लाभला आहे. या वारशामध्ये तपोवनाचे स्थान महत्त्वपूर्ण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भारतीय परंपरेत अरण्ये ही ज्ञानसाधना आणि निसर्गाशी सहअस्तित्वाची स्थाने मानली गेली असून, तपोवन ही त्या परंपरेचे जिवंत प्रतीक असल्याचेही म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande