
रत्नागिरी, 25 ऑक्टोबर (हिं.स.) । मासेमारीकरिता आवश्यक असलेल्या डिझेल दरवाढी संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी सभापती महेश नाटेकर यांनी बुधवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.
डिझेल दरवाढीच्या समस्येमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना व सहकारी संस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर गुहागर येथील शिवसेना जिल्हा परिषद सदस्य व कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी बैठकीचे आयोजन केले आहे.
डिझेल दरवाढीमुळे मासेमारी व्यवसायावर होत असलेला परिणाम आणि या संदर्भात शासनाने करावयाची उपायोजना, मच्छीमार म्हणून आपण कशा पद्धतीने पाठपुरावा केला पाहिजे यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक कृषी सभापती महेश नाटेकर यांच्या दालनामध्ये होईल.
जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी या विशेष बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी सभापती महेश नाटेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी