
रत्नागिरी, 25 ऑक्टोबर (हिं.स.) । जगभरातील चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींचे दर्शन घेतले. सचिन तेंडुलकर यांच्या या भेटीमुळे गणपतीपुळे परिसरात त्यांच्या चाहत्यांसाठी हा अविस्मरणीय क्षण ठरला.
क्रिकेटविश्वात आपल्या अतुलनीय कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करणारे सचिन तेंडुलकर हे भारतासह जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांच्या गणपतीपुळे भेटीमुळे कोकणच्या धार्मिक आणि पर्यटनस्थळाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
मराठी माणसाचा आणि कोकणचा अभिमान असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांची शिखरे गाठणाऱ्या या महान खेळाडूने गणरायाच्या चरणी नतमस्तक होत श्रींचे आशीर्वाद घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी