उद्या सेलूत डॉ. किरण कुलकर्णी यांचे व्याख्यान; शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम
परभणी, 25 ऑक्टोबर, (हिं.स.)। सेलू येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शहरातील साई नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता अक्षर व्याख्यानमाला आयोजित केले आहे.
उद्या सेलूत डॉ. किरण कुलकर्णी यांचे व्याख्यान; शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम


परभणी, 25 ऑक्टोबर, (हिं.स.)।

सेलू येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शहरातील साई नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता अक्षर व्याख्यानमाला आयोजित केले आहे. हे अक्षर व्याख्यानमालेचे सहावे वर्षे आहे.

अक्षर व्याख्यानमालेत ' मराठी भाषेचे संवर्धन : शासन ,समाज आणि नव्या पिढीची भूमिका ' या विषयावर किरण कुलकर्णी ( सचिव, मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई ) यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव लहाने हे असतील.अक्षर व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर, डॉ. सतीश मगर, एकनाथ जाधव, डॉ.अशोक पाठक, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, मुख्याध्यापक रमेश नखाते, रामराव बोबडे, सुभाष मोहकरे, माधव गव्हाणे, सच्चिदानंद डाखोरे, संतोष ताल्डे, पांडुरंग पाटणकर परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमात डॉ. पवन चांडक, डॉ. सखाराम कदम, मनिषा आष्टीकर, प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, रामराव गायकवाड, माधव गव्हाणे, संध्या फुलपगार, विजय ढाकणे, षडानन देशमाने, डॉ. निलेश पांचाळ यांचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande