श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, सलमान अली आगाचे पुनरागमन
इस्लामाबाद, 25 ऑक्टोबर (हिं.स.) | पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी १४ सदस्यीय प्राथमिक संघ जाहीर केला आहे. माजी कर्णधार शान मसूदला संघातून वगळण्यात आले आहे, तर सलमान अली आगाचे संघात पुनरागमन
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लोगो संग्रहित फोटो


इस्लामाबाद, 25 ऑक्टोबर (हिं.स.) | पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी १४ सदस्यीय प्राथमिक संघ जाहीर केला आहे. माजी कर्णधार शान मसूदला संघातून वगळण्यात आले आहे, तर सलमान अली आगाचे संघात पुनरागमन झाले आहे.

आगासह सात पाकिस्तानी क्रिकेटपटूंना इंग्लंड दौऱ्याच्या मध्यातच मायदेशी परत पाठवण्यात आले होते. मात्र, एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक झळकावल्यानंतर त्याचे नुकतेच कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. अली उस्मानचेही संघात पुनरागमन झाले आहे.

पाकिस्तानने कसोटी संघात तीन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मोहम्मद ताहा, मोहम्मद सुलेमान आणि समीर मिन्हास यांचा संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे.

बाबर आझम संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे, परंतु मोहम्मद रिझवान आणि इमाम-उल-हक यांना अद्याप संघात परत बोलावण्यात आलेले नाही. २६ वर्षीय डावखुरा फलंदाज ताहाने प्रेसिडेंट्स ट्रॉफी ग्रेड १ प्रथम-श्रेणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती.ताहाने सात सामन्यांमध्ये ७३० धावा केल्या आहेत. तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. सुलेमानने ६५२ धावा, तर समीरने ४०५ धावा केल्या आहेत. या तिघांनाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले आहे.

दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना ९ नोव्हेंबरपासून रावळपिंडी येथे खेळला जाईल. मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना १७ नोव्हेंबरपासून लाहोर येथे खेळला जाईल. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा एक भाग आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तान शेवटच्या स्थानावर आहे, तर श्रीलंका सातव्या स्थानावर आहे. पाकिस्तानसाठी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणे जवळपास अशक्य आहे.

पाकिस्तान कसोटी संघ

बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला फजल, अली उस्मान, अराफत मिन्हास, अझान अवैस, मोहम्मद अब्बास, मोहम्मद गाझी घोरी (यष्टीरक्षक), मोहम्मद सुलेमान, मोहम्मद ताहा, रझाउल्ला साद बेग (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, समीर मिन्हास, सौद शकील.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande