रत्नागिरी : घाटिवळे, करंजारी येथे एकाच रात्रीत पाच ठिकाणी घरफोड्या
रत्नागिरी, 26 ऑक्टोबर (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटिवळे आणि करंजारी गावातील एकाच रात्री पाच बंद घर फोडून चोरांनी पोबारा केला. घाटिवळे गावातील अब्दुल रहमान फोडकर, इकबाल उमर फोडकर , अब्दुल मज्जिद शिरगावक
रत्नागिरी : घाटिवळे, करंजारी येथे एकाच रात्रीत पाच ठिकाणी घरफोड्या


रत्नागिरी, 26 ऑक्टोबर (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटिवळे आणि करंजारी गावातील एकाच रात्री पाच बंद घर फोडून चोरांनी पोबारा केला.

घाटिवळे गावातील अब्दुल रहमान फोडकर, इकबाल उमर फोडकर , अब्दुल मज्जिद शिरगावकर घाटिवळे मुसलमानवाडीतील या तिघांची बंद घरे चोरट्याने फोडली. कुलपे तोडून यातील काही ऐवज लंपास केला.

घाटिवळे गावातील चोऱ्या करून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील करंजारी गावातील चंद्रकांत शिवराम भुर्के, बाबा वळंजु या दोन्ही घरांना चोरट्याने लक्ष्या केले. ही दोन्ही घरे महामार्गालगत असून भुर्के यांचे घर बंदच होते. परंतु बाबा वळंजू काही कामानिमित्त बाहेर गेलेले असताना चोरांनी डल्ला मारला. या दोन्ही घरातून सुमारे 52 हजाराचा ऐवज लंपास असल्याचे समजते. बाबा वळंजू यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला आणि चोरीनंतर पुन्हा दाराला दुसरे कुलूप लावून पोबारा केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande