
नाशिक, 26 ऑक्टोबर (हिं.स.)।
: रिसेप्शनिस्टचे काम आटोपून घरी जाणाऱ्या महिलेला जवळ बोलावून तिचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही नाशिकरोड परिसरात असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टचे काम करते. दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पीडित महिला काम आटोपून घरी जाण्यासाठी गेटच्या बाहेर पार्क केलेली तिची मोटारसायकल घेण्यासाठी गेली असता त्यावेळी संशयित डॉक्टर
आनंद भुजबळ (वय ४२) यांनी फिर्यादीस थांबवून मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे बोलून फिर्यादीच्या जवळ येऊन तिचा डावा हात धरून तिला जवळ ओढून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला, तसेच त्या ठिकाणी असलेले दुसरे संशयित डॉ. गुप्ता (वय ४२, रा. पळसे) यांनीदेखील पीडितेच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोन्ही डॉक्टरांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI