संघाच्या पथसंचलनावर दगडफेक प्रकरणी ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा, १५ ते २० जण ताब्यात
जळगाव, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचलनादरम्यान तणाव निर्माण होऊन दगडफेकीची घटना घडली. पथसंचलनाच्या मार्गावरून एका गटाने विरोध दर्शवल्यानंतर परिस्थिती चिघळ
पोलिस ठाण्याबाहेरील गर्दीचे संग्रहित छायाचित्र


जळगाव, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचलनादरम्यान तणाव निर्माण होऊन दगडफेकीची घटना घडली. पथसंचलनाच्या मार्गावरून एका गटाने विरोध दर्शवल्यानंतर परिस्थिती चिघळली. यावेळी झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. या प्रकरणी ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती असून, पोलिसांनी १५ ते २० जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन जाणार असलेल्या मार्गावर एका मशिदीनजीक काही नागरिकांनी विरोध दर्शवला. यावेळी काही मुस्लिम महिलांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला. दरम्यान, वाद वाढल्यानंतर दगडफेक झाल्याचे वृत्त असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. घ

टनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली करत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त किनगाव येथे पाठवला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्यासह भुसावळ, यावल आणि रावेर येथील पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली.

पोलिसांच्या बंदोबस्तात पथसंचलन पूर्ण करण्यात आले. दरम्यान, या घटनेप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली असून, संशयितांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असल्याचे वृत्त आहे. दगडफेक नेमकी कोणी सुरू केली आणि घटनेत कोणाची काय भूमिका होती, याचा तपास पोलीस करत आहेत.

किनगावमध्ये तणावपूर्ण शांतता

घटनेनंतर किनगाव परिसरात तणावपूर्ण शांतता असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande