अमरावतीत राजहंस दूध एजन्सीमधील १८६ लिटर दूध नष्ट
अमरावती, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या पथकाने राजकमल चौक येथील राजहंस दूध एजन्सीमध्ये धाड टाकून पाहणी केली असता कोजागिरीकरिता आलेले १८६ लिटर दूध भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून जप्त करून नष्ट केले. या कारवाईमुळे शहरातील दूध डे
राजहंस दूध एजन्सीमधील १८६ लिटर दूध केले नष्ट अन्न व औषधी प्रशासन विभागाची कारवाई


अमरावती, 26 ऑक्टोबर (हिं.स.)।

अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या पथकाने राजकमल चौक येथील राजहंस दूध एजन्सीमध्ये धाड टाकून पाहणी केली असता कोजागिरीकरिता आलेले १८६ लिटर दूध भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून जप्त करून नष्ट केले. या कारवाईमुळे शहरातील दूध डेअरीचालकामध्ये खळबळ उडाली आहे.

कोजागिरी पोर्णिमा पाहता अन्न व औषधी प्रशासन विभागाने जिल्ह्यात दूध डेअरींसह अन्य खाद्यपदार्थांच्या दुकानाची तपासणी सुरु केली आहे. शनिवारी त्यांनी कन्हैया दूध डेअरीमधील १० किलो पनीर नष्ट केले. तसेच इतवारा बाजारातील काही दुकनांची तपासणी करुन २९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केला. तसेच कोजागिरी पोर्णिमेला दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे काही दूध डेअरी चालक भेसळयुक्त दुध विक्री करीत असल्याचा संशय संबंधित अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्यांनी शहरातील काही दूध डेअरींची तपासणी केली. तसेच राजकमल येथील राजहंस दूध डेअरीची तपासणी केली असता डेअरीमध्ये सकाळी ४.३० वाजता १८६ लिटर दूध आले. परंतु दुधाची वाहतूक करतांना नियमांचे पालन करण्यात आले नाही आणि दुपारी ११ पर्यंत दूध कोल्ड स्टेरेजमध्ये ठेवण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित दूध संशय भेसळयुक्त असल्याचा असल्यामुळे ११ हजार ५३२ रुपयांचे १८६ लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईत अन्न व औषधी विभागाचे गजानन गोरे, आदिती देशमुख व अन्य कर्मचाऱ्यांच्या समावेश होता.

कन्हैया मिल्क डेअरीमध्ये 10 किलो चीज नष्टतपासणीदरम्यान, कन्हैया मिल्क डेअरीमध्ये लेबल नसलेला पनीर साठा आढळून आला. अधिकाऱ्यांनी अंदाजे १० किलो पनीर नष्ट केले. खाद्यपदार्थांवर आवश्यक लेबल नसल्यामुळे ग्राहकांना उत्पादन ओळखण्यात आणि संबंधित माहिती मिळवण्यात समस्या येऊ शकतात. त्यामुळे, प्रशासनाने संबंधित चीजच्या साठ्यावर कारवाई केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande