अमरावतीत शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ; २६ उमेदवारांच्या भाग्याचा निकाल लागणार
अमरावती, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून सुरूवात झाली. मतमोजणीअखेर एकूण २६ उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय होणार आहे. बंडखोरीने गाजलेल्या या लढतीत महायुती आणि
अमरावतीत शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ; २६ उमेदवारांच्या भाग्याचा निकाल आज!


अमरावती, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून सुरूवात झाली. मतमोजणीअखेर एकूण २६ उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय होणार आहे. बंडखोरीने गाजलेल्या या लढतीत महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकशाही भवनात एकुण १४ टेबलवर मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यासाठी एकाच कक्षात प्रत्येकी १४ टेबलच्या रांगा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या निरीक्षणासाठी नियुक्त उमेदखरांच्या प्रतिनिधीसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक आणि एक शिपाई असा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. सुरूवातीला मतपेट्या उघडणे, मतपत्रिकांचे गड्ढे तयार करणे, मतपत्रिका वैध, अवैध अचूक वर्गीकरण करणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत.

यांच्या भवितव्याचा होणार निर्णय

या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक, काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे, भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे, शिवसेना ठाकरे गटाचे दत्तात्रय कहाने, भाजपचे दुसरे बंडखोर चंद्रशेखर भोयर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू, विजुक्टाचे डॉ. अविनाश बोर्डे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. प्रशांत विधे, शिक्षक भारतीचे सुरेश देवकर यांच्यासह २६ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.मतमोजणी प्रकिया पार पाडण्यासाठी एकूण 152 अधिकारी/कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून २३ अधिकारी/ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. याप्रमाणे एकूण १७५ अधिकारी आणि कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तसेच या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. प्रत्येक ३ टेबलवरील मतमोजणी कार्यावर प्रत्येकी १ जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नियंत्रण आहे. अशा पध्दतीने विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.दुपारी 1 वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande