छ. संभाजीनगर - ‘प्रौढ प्रताप पुरंदर’महानाट्याचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याची, पराक्रमाची आणि हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची भव्य अनुभूती देणाऱ्या ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या ऐतिहासिक महानाट्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखा
फ


छत्रपती संभाजीनगर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याची, पराक्रमाची आणि हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची भव्य अनुभूती देणाऱ्या ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या ऐतिहासिक महानाट्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.

या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, नागपूरच्या भोसले राजघराण्याचे मुदोजीराजे भोसले आणि तंजावरच्या मराठा राजघराण्याचे प्रतापसिंह सर्फोजीराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि मराठा इतिहासाच्या गौरवशाली परंपरेचा वारसा जपणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांसाठी १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जाबिंदा लॉन्स येथे हे महानाट्य विनामूल्य सादर करण्यात येत आहे. या महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्वितीय नेतृत्व, स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्यांचे अतुलनीय शौर्य आणि राष्ट्रप्रेरणेचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात येत आहे.

इतिहासाची भव्यता, स्वराज्याचा अभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची रोमांचकारी अनुभूती देणारा हा महानाट्य सोहळा प्रत्येक शिवप्रेमी नागरिकासाठी अविस्मरणीय पर्व ठरणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील सर्व नागरिकांनी या भव्य ऐतिहासिक महानाट्याला आवर्जून उपस्थित राहून विनामूल्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande