छ. संभाजीनगर - 7२९ गावांसाठी पाणीटंचाई निवारण आराखडा; माणसं, पशुधनाचीही तहान भागणार
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)दुष्काळ परिस्थिती बाबत जिल्हा परिषदेत सर्व विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून व्यापक नियोजन करण्यात येत आहे. माणसांसोबतच पशुधनाचीही तहान भागावी
भ


छत्रपती संभाजीनगर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)दुष्काळ परिस्थिती बाबत जिल्हा परिषदेत सर्व विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून व्यापक नियोजन करण्यात येत आहे. माणसांसोबतच पशुधनाचीही तहान भागावी, यासाठी जिल्ह्यातील तब्बल ७२९ गावांवर लक्ष केंद्रित करून विशेष कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्यानंतर पाण्यासाठी होणारी धावपळ, टँकरची प्रतीक्षा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी कसरत होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पाण्याची उपलब्धता तपासून आवश्यक त्या ठिकाणी बोअर, पाण्याच्या टाक्या आणि हौदांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.

गावकऱ्यांची सोय, पाण्याची उपलब्धता आणि जनावरांना सहज पाणी मिळेल, अशा ठिकाणांची निवड करून उपाययोजना केल्या जाणार आहेत. संभाव्य टंचाईच्या काळात नागरिकांची पाण्यासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नियोजनाला गती देण्यात येत आहे.

या उपक्रमात केवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न करता पशुधनासाठीही स्वतंत्र पाण्याचे हौद उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे माणसांची तहान भागवतानाच मुक्या जनावरांनाही पाण्याचा आधार मिळणार आहे. दुष्काळाच्या काळात ग्रामीण भागाला दिलासा देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande