रायगड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ द्या : महेश ढवळे
रायगड, २७ ऑक्टोबर (हिं.स.) : जिल्ह्यातील पात्र आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवावा. कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्
शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्यातील पात्र आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा. कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात नियतन, धान्याची उचल व वाटप तसेच शालेय पोषण आहाराच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  रास्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याच्या दर्जाची अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळते की नाही, याची खातरजमा करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. रास्त धान्य दुकाने नियमितपणे वेळेत सुरू राहतील आणि दुकानांच्या दर्शनी भागात ठळक अक्षरांत नामफलक लावलेले असतील, याची दक्षता घ्यावी, असे ढवळे यांनी सांगितले. पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नयेत, यासाठी विशेष प्रयत्न करावेत. रायगड जिल्ह्यात आदिवासी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने अधिकाऱ्यांनी आदिवासी वाड्या-वस्त्यांना भेटी देऊन नागरिकांना विविध योजनांची माहिती द्यावी आणि पात्र व्यक्तींना त्यांचा लाभ मिळवून द्यावा. कोणताही लाभार्थी उपाशी झोपणार नाही, या भावनेतून अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.  अंगणवाड्यांमधील बालकांना पोषक पूरक आहार देऊन त्यांच्या योग्य वाढीकडे लक्ष द्यावे. शालेय पोषण आहाराबाबत पालकांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे. तसेच गरोदर आणि स्तनदा मातांना प्रधानमंत्री मातृ वंदना व लेक लाडकी यांसारख्या योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे निर्देशही ढवळे यांनी दिले.

रायगड, २७ ऑक्टोबर (हिं.स.) : जिल्ह्यातील पात्र आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवावा. कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात नियतन, धान्याची उचल व वितरण तसेच शालेय पोषण आहाराच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रास्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना वितरित होणाऱ्या धान्याच्या दर्जाची नियमित तपासणी करावी. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य योग्य प्रमाणात मिळते की नाही, याची खातरजमा करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच रास्त धान्य दुकाने नियमितपणे आणि निर्धारित वेळेत सुरू राहतील, याची काळजी घ्यावी. दुकानांच्या दर्शनी भागात ठळक अक्षरांत नामफलक लावणेही आवश्यक असल्याचे ढवळे यांनी स्पष्ट केले.

पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. रायगड जिल्ह्यात आदिवासी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने अधिकाऱ्यांनी आदिवासी वाड्या-वस्त्यांना भेटी देऊन नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती द्यावी. तसेच पात्र व्यक्तींना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा. कोणताही लाभार्थी उपाशी झोपणार नाही, या भावनेतून अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले.

अंगणवाड्यांमधील बालकांना पोषक पूरक आहार देऊन त्यांच्या योग्य वाढीकडे लक्ष द्यावे. शालेय पोषण आहाराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकांच्या बैठका आयोजित करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय, गरोदर आणि स्तनदा मातांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजना तसेच लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवून द्यावा. या महिलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी स्पष्ट केले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

 rajesh pande