
रायगड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। रायगड विभागातील डाक सेवांसंबंधित प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग येथे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँक व मनीऑर्डर सेवांसंबंधित सहा आठवड्यांत न सुटलेल्या तक्रारींचा यामध्ये विचार केला जाणार आहे.
तक्रारदारांनी तक्रारीचा दिनांक, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पदनाम यांसह तक्रारीच्या दोन प्रती ३१ ऑक्टोबरपर्यंत अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग येथे पोहोचतील अशा प्रकारे पाठवाव्यात. यापुढे डाक अदालत दरमहा पहिल्या सोमवारी आयोजित केली जाणार असून, त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी ती घेण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)