शासकीय योजनांसाठी मध्यस्थांना पैसे देऊ नका; अयोध्याताई खिस्ते यांचे नागरिकांना आवाहन
परभणी, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। घरकुल व विविध वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोणी पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी सावध राहावे. कोणत्याही मध्यस्थाला पैसे देऊ नयेत, असे आवाहन जिंतूर पंचायत समितीच्या सभापती अयोध्यात
शासकीय योजनांसाठी मध्यस्थांना पैसे देऊ नका; अयोध्याताई खिस्ते यांचे नागरिकांना आवाहन


परभणी, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। घरकुल व विविध वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोणी पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी सावध राहावे. कोणत्याही मध्यस्थाला पैसे देऊ नयेत, असे आवाहन जिंतूर पंचायत समितीच्या सभापती अयोध्याताई खिस्ते यांनी केले आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरीब, गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहोचावा, यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमानुसार अर्जप्रक्रिया पूर्ण करावी. घरकुलाचा हप्ता मंजूर करून देणे, लाभार्थी नोंदणी करणे किंवा वैयक्तिक लाभाच्या योजनांचा फायदा मिळवून देण्याच्या नावाखाली कोणी पैशांची मागणी केल्यास संबंधित अधिकार्यांकडे तक्रार करावी. योजनांची अधिकृत माहिती पंचायत समिती कार्यालयातून घ्यावी. कोणत्याही आमिषाला बळी न पडता अधिकृत प्रक्रियेद्वारेच शासकीय योजनांचा लाभ घ्यावा आणि आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन खिस्ते यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande