
परभणी, 28 ऑक्टोबर (हिं.स.) राज्य महामार्ग 61 वरील पोहे टाकळी शिवारात राज्य परिवहन महामंडळ व एका दुचाकीच्या धडकेत दोघा सालगड्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बुधवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली.कुलदीप शिसोदीया व अनारसिंग चव्हाण हे दोघे या शिवारातील एका शेतात सालगडी म्हणून काम करीत होते. मूळ मध्यप्रदेशातील हे दोघे बुधवारी सायंकाळी एम.पी.68 एम.जी. 3335 या दुचाकीवरुन एका ऊसाच्या वाहनाला ओव्हरटेक करीत पुढे जात होते. त्याचवेळी पाथरीच्या दिशेने जाणार्या एम.एच. 20 बी.एल. 3501 या क्रमांकाच्या बसची व या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात ते दोघे जागीच मृत्यू पावले. दरम्यान या घटनेचे वृत्त कळाल्याबरोबर प्रत्यक्षदर्शनींनी घटनास्थळी धाव घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis