पुणे - आ. सुनील शेळकेंच्या निषेधार्थ माहिती अधिकार कार्यकर्त्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
पुणे, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भ्रष्टाचार काढू नये यासाठी गुंड पाठवून मारहाण केली. या संदर्भात सुनील गुजर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे
Right to Information


पुणे, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भ्रष्टाचार काढू नये यासाठी गुंड पाठवून मारहाण केली. या संदर्भात सुनील गुजर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करीत याकडे शासनाचे लक्ष वेधले. कथित खाण व्यवहार आणि रॉयल्टीबाबतही प्रश्न, निष्पक्ष चौकशीची मागणीही गुजर यांनी केली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना सुनील गुजर यांनी सांगितले, की टाटा कंपनीचे बेकायदेशीर हजारो कोटी रुपयांच्या बेकायदेशीर उत्खनना संदर्भात व तळेगाव एमआयडीसीतील आंबळे गावातील भ्रष्टाचार जगासमोर आणला. याचा राग मनात धरून १६ ऑक्टोबर रोजी मावळ विधानसभा आमदार सुनील शेळके यांनी काही गुंडासह आपल्याला मारहाण केली. माहिती अधिकारातून मिळवलेली कागदपत्रे हिसकावून घेण्यात आली. तसेच 'माझ्याविरोधात कागदपत्रे काढतो काय, थांब तुझा किशोर आवारे सारखा कार्यक्रम करतो', म्हणत धमकी दिली. आपल्या समवेत जमीन हक्क परिषदेच्या राज्य महिला अध्यक्ष करुणाताई सरोदे यांना जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली.

जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व पीडित न्याय मागायला येत असतात आणि तिथेच जर अनुचित प्रकार घडत असेल, तर न्याय कुठे मागायचा ? त्यामुळे या प्रकरणात स्वतः जिल्हाधिकारी यांनी फिर्याद देऊन साक्षीदार म्हणून त्यांचे प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना साक्षीदार बनवून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा. मावळ टाटा गौण खनिजाची चौकशी करून दंड वसुल करून सरकारी तिजोरीत रक्कम अदा करावी, ही आमची मागणी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande