अलाहाबाद उच्च न्यायालयाचा दोन पॅन कार्ड प्रकरणांमध्ये आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला यांना जामीन मंजूर
प्रयागराज, 29 ऑक्टोबर (हिं.स.)अलाहाबाद उच्च न्यायालयाने समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आझम खान आणि त्यांचे पुत्र अब्दुल्ला आझम यांना दोन पॅन कार्ड बाळगल्याच्या प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल
आझम खान


प्रयागराज, 29 ऑक्टोबर (हिं.स.)अलाहाबाद उच्च न्यायालयाने समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आझम खान आणि त्यांचे पुत्र अब्दुल्ला आझम यांना दोन पॅन कार्ड बाळगल्याच्या प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली असून त्यांचे जामीन अर्ज मंजूर केले आहेत. न्यायमूर्ती समित गोपाल यांच्या एकल खंडपीठाने हा निकाल दिला. मागील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून आपला निर्णय राखून ठेवला होता.

आझम खान आणि अब्दुल्ला आझम यांनी सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला आणि दोषसिद्धीला आव्हान देत फौजदारी पुनरीक्षण याचिका दाखल केल्या होत्या. त्यांनी आपल्या याचिकांवर अंतिम निकाल लागेपर्यंत अंतरिम दिलासा मागितला होता, ज्यात दोषसिद्धीला स्थगिती, शिक्षेला स्थगिती आणि अंतरिम जामिनाची मागणी केली होती.

आझम खान यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी, एन. आय. जाफरी आणि वकील शशवत आनंद यांनी बाजू मांडली. राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील आणि अतिरिक्त महाधिवक्ता अनूप त्रिवेदी यांनी युक्तिवाद सादर केला.

अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, आझम खान आणि अब्दुल्ला आझम यांच्यावर वेगवेगळ्या जन्म तारखा असलेले दोन पॅन कार्ड मिळवून वापरल्याचा आरोप आहे. असाही आरोप आहे की, त्या दोन पॅन कार्डांचा वापर निवडणूक उमेदवारी अर्जात करण्यात आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande