
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.) वडवळी येथे श्री बालाजी लळीत यात्रा महोत्सवानिमित्त श्री बालाजी मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन श्री बालाजी चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या महोत्सवामुळे परिसरात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत मंजूर २ कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या विकासकामांमुळे श्री बालाजी मंदिर परिसराचा विकास होण्यासोबतच भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होतील. तसेच वडवळीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला अधिक वैभव प्राप्त होईल.यावेळी उपस्थित ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धेचा वारसा जपत विकासाची नवी दिशा देत, वडवळीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील आहोत.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis