अमरावतीच्या कुंकूम मोहोडचा आशियाई स्पर्धेत पुन्हा सुवर्णवेध
अमरावती, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। अमरावतीची १७ वर्षीय प्रतिभावान धनुर्धर कुंकूम अनिल मोहोड हिने जपान येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावत पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली. कुंकूमच्या या ऐति
अमरावतीच्या कुंकूम मोहोडचा आशियाई स्पर्धेत पुन्हा सुवर्णवेध!रिकर्व्ह तिरंदाजीत देशाला सुवर्णपदक


अमरावती, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। अमरावतीची १७ वर्षीय प्रतिभावान धनुर्धर कुंकूम अनिल मोहोड हिने जपान येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावत पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली. कुंकूमच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचा मान कुंकूमने मिळविला असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. अत्यंत बेताच्या कौटुंबिक परिस्थितीतून पुढे येत कुंकूमने आपल्या अफाट कौशल्यासोबतच जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे.कुंकूमच्या सुवर्णयशाची बातमी अमरावतीत पोहोचताच तिच्या घरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कुटुंबीय, नातेवाईक आणि चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून तसेच एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल विविध क्षेत्रांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, कुंकूमच्या यशामुळे अमरावतीच्या क्रीडा क्षेत्रालाही नवी ऊर्जा मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande