रेडमी १७सी ५जी स्मार्टफोन भारतात लाँच
मुंबई, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। रेडमीने आपला नवीन रेडमी १७सी ५जी स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२६ मध्ये हा फोन जागतिक बाजारात सादर करण्यात आला होता. मोठी स्क्रीन, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर आणि ६,
Redmi 17C 5G Smartphone Launched in India


मुंबई, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। रेडमीने आपला नवीन रेडमी १७सी ५जी स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२६ मध्ये हा फोन जागतिक बाजारात सादर करण्यात आला होता. मोठी स्क्रीन, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर आणि ६,००० एमएएच क्षमतेची बॅटरी ही या फोनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत २०,९९९ रुपये ठेवण्यात आली असून, विक्रीला ७ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे.

रेडमी १७सी ५जीमध्ये ६.९ इंचांची एचडी प्लस एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. या स्क्रीनचे रिझोल्यूशन ७२० बाय १६०० पिक्सेल असून, १२० हर्ट्झपर्यंत रिफ्रेश रेट आणि ८१० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळते. तसेच २४० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, टीयूव्ही र्हाइनलँडचे लो ब्लू लाइट प्रमाणपत्र आणि फ्लिकर फ्री सपोर्ट देण्यात आला आहे. धूळ आणि पाण्याच्या शिंतोड्यांपासून संरक्षणासाठी आयपी६४ रेटिंगही मिळाले आहे.

या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसर आणि माली-जी५७ एमसी२ जीपीयू देण्यात आला आहे. यामध्ये ४ जीबी आणि ६ जीबी रॅमचे पर्याय असून, १२८ जीबी स्टोरेज मिळते. व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅमची क्षमता आणखी ६ जीबीपर्यंत वाढवता येते. मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवण्याची सुविधाही आहे.

छायाचित्रणासाठी फोनच्या मागील बाजूस एफ/१.८ अपर्चरसह ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी एफ/२.० अपर्चरसह ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात पोर्ट्रेट, नाइट, टाइम-लॅप्स आणि एचडीआर मोड उपलब्ध आहेत. मागील कॅमेऱ्याद्वारे ३० एफपीएस वेगाने १०८० पिक्सेल व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते.

फोनमध्ये ६,००० एमएएचची बॅटरी असून, ३३ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. ब्लूटूथ ५.४, ड्युअल-बँड वाय-फाय, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर ही इतर वैशिष्ट्ये आहेत. कॉफी ब्रू, पर्पल डॉन आणि डार्क नाइट या तीन रंगांत फोन उपलब्ध होईल.

४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या प्रकाराची किंमत २०,९९९ रुपये, तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या प्रकाराची किंमत २२,९९९ रुपये आहे. या किमतीच्या श्रेणीत लावा विराट कर्व्ह ५जी आणि इनफिनिक्स हॉट ७० प्रो या स्मार्टफोनशी त्याची स्पर्धा होणार आहे. या प्रतिस्पर्धी फोनमध्ये उच्च रिफ्रेश रेट, डायमेन्सिटी ७१०० प्रोसेसर किंवा अधिक वेगवान चार्जिंगसारखी वैशिष्ट्ये दिली जातात. दुसरीकडे, रेडमी १७सी ५जीमध्ये हायपरओएस ३ सॉफ्टवेअरचा अनुभव मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande