सोलापूर - जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येच ठरावांवरून वाद
सोलापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मं.) येथील विकास सेवा सोसायटीतून शेजारील कर्नाटकातील एका व्यक्तीच्या नावाने थेट ठराव पाठवण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या ठरावावर भाजपच्याच नेत्यांकडून हरकत घेण्यात आल्याने जिल्हा मध
dcc


सोलापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.)।

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मं.) येथील विकास सेवा सोसायटीतून शेजारील कर्नाटकातील एका व्यक्तीच्या नावाने थेट ठराव पाठवण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या ठरावावर भाजपच्याच नेत्यांकडून हरकत घेण्यात आल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच दाखल झालेल्या ठरावांवरील हरकतींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीसाठी एकूण २ हजार १६५ ठराव दाखल झाले असून, त्यावर आलेल्या हरकतींमधून विविध गटांतील मतभेद आणि वर्चस्वाच्या संघर्षाचे चित्र समोर येत आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील १४ संस्थांच्या ठरावांवर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर हे मतभेद दूर करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande