चारा डेपोऐवजी थेट मदत द्या; मंगळवेढा-सांगोल्यात शेतकऱ्यांचा आग्रह
सोलापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा डेपो आणि जनावरांच्या छावण्यांऐवजी शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे केली. जिल्हा
चारा डेपोऐवजी थेट मदत द्या; मंगळवेढा-सांगोल्यात शेतकऱ्यांचा आग्रह


सोलापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.)।

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा डेपो आणि जनावरांच्या छावण्यांऐवजी शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही तालुक्यांतील विविध गावांना भेटी देत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, कोरड्या विहिरी तसेच जनावरांसाठी उपलब्ध चाऱ्याची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि विविध मागण्या जाणून घेतल्या.

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानीची वस्तुनिष्ठ आणि अचूक नोंद घेऊन पंचनामे करण्यात यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande