परतीचा पाऊस लांबला; सोलापुरात तापमान ३७ अंशांवर
सोलापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। परतीच्या पावसाची प्रतीक्षा असतानाच सोलापूरच्या तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. शहराचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. यंदा ४ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण मह
temp Solparu


सोलापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.)।

परतीच्या पावसाची प्रतीक्षा असतानाच सोलापूरच्या तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. शहराचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. यंदा ४ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महिनाभर शहराचे तापमान ३५ ते ३७ अंशांच्या दरम्यान राहिले.

गेल्या पंधरा दिवसांत शहरातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, हा पाऊस तुरळक स्वरूपाचा असल्याने जमिनीतील ओलावा वाढण्यास फारसा फायदा झाला नाही. वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होत असून खरीप पिकांवरही त्याचा परिणाम झाला आहे. काही भागांतील उभी पिके करपण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

येत्या काही दिवसांत तापमान चाळीस अंशांच्या जवळ जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढल्याचे चित्र आहे. पुढील काळात तापमान अधिक राहिल्यास थंडीचा कालावधी कमी होण्यासोबतच आगामी उन्हाळाही तीव्र राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, परतीचा पाऊस लांबल्याने जलसाठ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ऐन हिवाळ्याच्या तोंडावर सोलापूरला जलसंकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी आगामी काळातील पाऊस आणि उपलब्ध पाणीसाठ्यांकडे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande