अमरावतीत एमडी ड्रग्जसह गांजा जप्त; तीन कारवायांत ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.) अमरावती शहरात अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने धडक मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून तिघांना अटक करण्यात आली.
एमडी ड्रग्जसह गांजा जप्त; तीन कारवायांत ८ लाख ११ हजारांचा मुद्देमाल हस्तगत


अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.)

अमरावती शहरात अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने धडक मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एमडी (मेफेड्रॉन) पावडर, गांजा आणि इतर साहित्य असा एकूण ८ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पहिली कारवाई २७ ऑक्टोबर रोजी नवसारी ते लालखडी रिंग रोडवरील मदिना हॉटेल परिसरात करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अहसान खान रोवंगर खान (वय २२, रा. कसाबपुरा, वलगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८३ ग्रॅम एमडी पावडर, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि होंडा डिओ मोपेड असा एकूण ३ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात नागपूर येथील अतिक दादा नामक व्यक्तीचा सहभाग असल्याचे आरोपीने सांगितले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या कारवाईत गांजा विक्रीसाठी येणाऱ्या नियाज खान नवाब खान (वय २३, रा. ताजनगर-१, अमरावती) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून ४ किलो ८२० ग्रॅम गांजा आणि एक बॅग असा २ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तिसऱ्या कारवाईत ऑक्सिजन पार्क परिसरात गांजा घेऊन आलेल्या मुकेश ज्ञानेश्वरराव पळसकर (वय ४४, रा. महादेव खोरी, अमरावती) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ५ किलो ५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत २ लाख ५० हजार रुपये असून, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande