उदगीर शहरात जमिनीच्या पैशावरून बापाला बेदम मारहाण; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
लातूर, 11 नोव्हेंबर, (हिं.स.) - जमीन विक्रीचे पैसे दे, असे म्हणत वडिलांना शिवीगाळ करून काठीने मारहाण करून डाव्या हाताचे हाड मोडल्याची घटना उदगीर शहरातील दबीपुरा भागात घडली आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
उदगीर पोलीस


लातूर, 11 नोव्हेंबर, (हिं.स.) - जमीन विक्रीचे पैसे दे, असे म्हणत वडिलांना शिवीगाळ करून काठीने मारहाण करून डाव्या हाताचे हाड मोडल्याची घटना उदगीर शहरातील दबीपुरा भागात घडली आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चाँद फरीदसाब शेख (वय ६०, रा. शकील चौक, दबीपुरा, उदगीर) यांनी तक्रार दिली आहे. शकील चौक, दबीपुरा येथे आरोपी अफरोज चाँद शेख (रा. शकील चौक, दबीपुरा, उदगीर) याने फिर्यादीस जमीन विक्री केलेले पैसे दे, असे म्हणत शिवीगाळ केली.

त्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण करून डाव्या हाताच्या पंज्यावर काठीने मारले. यात फिर्यादीच्या पंज्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४४६/२०२६ अन्वये कलम ११८(१), ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२), (३) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.१३ वाजता दाखल झाला आहे.

पोलीस निरीक्षक श्री. भुसनुर साहेब यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह १०४० गोलंदाज हे करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande