


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलमय पर्वाला प्रारंभ
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण महाआरतीने होणार नवा विश्वविक्रम
नाशिक, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलमय पर्वाच्या पार्श्वभूमीवर आज तपोवन ते रामकुंड अशी सिंहस्थ कुंभमेळा महाध्वजाची भव्य परिक्रमा उत्साहात संपन्न झाली. उद्या ३१ ऑक्टोबर रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या धर्मध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या परिक्रमेत साधू-महंत, लोकप्रतिनिधी आणि हजारो भाविक सहभागी झाले. धार्मिक वातावरण, मंत्रोच्चार आणि जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
परिक्रमेला प्रारंभ होण्यापूर्वी तपोवन येथे धर्मध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. मंत्रोच्चाराच्या गजरात धर्मध्वजाला पुष्प अर्पण करून साधू-महंतांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर कुंभमेळा मंत्री यांच्या वतीने परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. तपोवनातून निघालेली ही भव्य शोभायात्रा तपोवन कॉर्नर काट्या मारुती चौकी देवी चौकी गणेश वाडी नेहरू चौक मेन रोड रविवार कारंजा मालेगाव स्टँड मार्गे रामकुंड येथे पोहोचली सर्व साधारण पाच किलोमीटर अंतराची ही परिक्रमा यात्रा होतीविविध धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात रामकुंड येथे पोहोचली. या परिक्रमेद्वारे सिंहस्थ कुंभमेळ्याचा धार्मिक आणि आध्यात्मिक संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या सोहळ्यात धर्मसम्राट श्री महंत ज्ञानदास महाराज, तिलाद्वारा गाद्याचार्य मंगलपीठाधीश्वर श्री श्री १००८ माधवदासजी महाराज, जगद्गुरू श्रीमद् स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्यासह चार जगद्गुरु सह विविध आखाड्यांचे साधू-महंत सहभागी झाले होते . तसेच पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, श्री गंगा गोदावरी पंचकोट पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी उपाध्यक्ष दिलीप शुक्ल वैभव दीक्षित प्रतीक शुक्ल शेखर शुक्ल यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि भाविकांची उपस्थिती होती. शोभा यात्रेमध्ये महाध्वजाचा रथ तसेच अमृतकुंबरत रामरत यासह विविध मठाचे महंत यांचे रथ आणि धर्मसम्राट गॅस महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांचे रथ सहभागी झाले होते 1000 पेक्षा अधिक स्वयंसेवक असलेल्या पर्यावरण संवर्धन वरती जनजागरण करण्यात आले तसेच नशा मुक्ती पथनाट्य रक्तदानाचे महत्त्व सांगणारे चित्र देखील यामध्ये सहभागी झाले होते याबरोबरच ढोल ताशाची पतके लेझीम पथक लाठीकाठी ढाल तलवार झाल्यास दानपट्टा मलखांब यासारख्या मर्दानी खेळाचे प्रदर्शन देखील आखाड्याच्या भक्तगणान केले.
दरम्यान, आज शुक्रवारी परिक्रमा काढण्यात आलेल्या याच धर्मध्वजाचे उद्या ३१ ऑक्टोबर रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधिवत ध्वजारोहण होणार आहे. त्यामुळे धर्मध्वज परिक्रमेने नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक सोहळ्यांना उत्साहात प्रारंभ झाला असून, या ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या ध्वजारोहण सोहळ्यात विक्रमी गर्दी होणार आहे यावेळी ध्वजारोहणाच्या निमित्ताने सायंकाळी गोदावरी मातेची आरती होणार असून ही आरतीला देखील राष्ट्रपती द्रोपदी मुर्म या उपस्थित राहणार आहेत . सर्वसाधारण 6657 आदिवासी बंधू ही आरती करणार आहे. याचवेळी व्यासपीठावरती तेरा आखाड्याचे प्रमुख महंत शंकराचार्य चार जगद्गुरु उपस्थित राहणार आहे हा एक विश्वविक्रम होणार असून राष्ट्रपतींबरोबरच दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि इतर मंत्री देखील शुक्रवारी होणाऱ्या नाशिक व त्रंबक मधील सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI