
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। देशांतर्गत सराफा बाजारात आज घसरणीचा कल दिसून येत आहे. सोन्याचे दर आज प्रति १० ग्रॅममागे १,५५० रुपयांपासून १,६९० रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे चांदीच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी प्रति किलोग्रॅममागे पाच हजार रुपयांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. अशा प्रकारे अवघ्या दोन दिवसांत चांदीचे दर प्रति किलोग्रॅममागे तब्बल १० हजार रुपयांनी घसरले आहेत.
दरात घसरण झाल्यामुळे देशातील विविध सराफा बाजारांत २४ कॅरेट सोन्याचा दर आज प्रति १० ग्रॅम १,४२,२५० रुपयांपासून १,४२,४०० रुपयांपर्यंत आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,३०,३९० रुपयांपासून १,३०,५४० रुपयांपर्यंत विकले जात आहे. चांदीच्या दरातही घसरण झाल्यामुळे ही चमकदार धातू दिल्लीच्या सराफा बाजारात आज प्रति किलोग्रॅम २,०९,९०० रुपयांच्या दराने विकली जात आहे.
दिल्लीत आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४२,४०० रुपये आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३०,५४० रुपये नोंदवण्यात आला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,४२,२५० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,३०,३९० रुपयांच्या दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा किरकोळ दर प्रति १० ग्रॅम १,४२,३०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३०,४४० रुपये नोंदवण्यात आला आहे.
या प्रमुख शहरांव्यतिरिक्त चेन्नईमध्ये आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,४२,२५० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,३०,३९० रुपयांच्या दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे कोलकात्यात २४ कॅरेट सोन्याचा दर १,४२,२५० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३०,३९० रुपये आहे. भोपाळमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४२,३०० रुपये आहे, तर २२ कॅरेट सोने १,३०,४४० रुपयांच्या दराने विकले जात आहे.
जयपूरमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,४२,४०० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,३०,५४० रुपयांच्या दराने विकले जात आहे. पाटण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर १,४२,३०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३०,४४० रुपये आहे. लखनौच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,४२,४०० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,३०,५४० रुपयांच्या दराने विकले जात आहे.
देशातील इतर राज्यांप्रमाणेच कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा येथील सराफा बाजारांतही आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. या तीन राज्यांच्या राजधानी असलेल्या बंगळुरू, हैदराबाद आणि भुवनेश्वर येथे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४२,२५० रुपये आहे. त्याचप्रमाणे या तिन्ही शहरांतील सराफा बाजारांत २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,३०,३९० रुपयांच्या दराने विकले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule