मारुती सुझुकी डिझायरच्या उत्पादनाचा आकडा ३५ लाखांच्या पार
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने (एमएसआयएल) आपल्या लोकप्रिय सेडान कार मारुती सुझुकी डिझायरच्या ३५ लाख (३.५ दशलक्ष) गाड्यांच्या उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. एमएसआयएलने
Maruti Suzuki Dzire crosses 35 lakhs units produ


नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने (एमएसआयएल) आपल्या लोकप्रिय सेडान कार मारुती सुझुकी डिझायरच्या ३५ लाख (३.५ दशलक्ष) गाड्यांच्या उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.

एमएसआयएलने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, त्यांच्या डिझायर या सेडान कारने एकूण ३५ लाख गाड्यांच्या उत्पादनाचा आकडा पार केला आहे. सध्या कंपनीच्या मानेसर येथील कारखान्यात तयार होणाऱ्या डिझायरने सुमारे १८ वर्षे आणि नऊ महिन्यांत ही कामगिरी केली आहे.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हिसाशी ताकेउची यांनी या प्रसंगी सांगितले, की डिझायरच्या एकूण ३५ लाख गाड्यांचे उत्पादन हा या मॉडेलच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ते म्हणाले, “आम्ही उत्पादन क्षमता वाढवण्यासोबतच भारतातील आणि जागतिक बाजारपेठांमधील ग्राहकांना जागतिक दर्जाची गुणवत्ता देण्यासाठी आणि त्यांचे समाधान करण्यासाठी कटिबद्ध आहोत.” उल्लेखनीय म्हणजे, एमएसआयएलच्या डिझायरव्यतिरिक्त ऑल्टो, स्विफ्ट आणि वॅगनआर या अन्य गाड्यांनीही उत्पादनाचा हा टप्पा पार केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande