मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
रायगड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत भारत निवडणूक आयोगाने १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. मतदारांनी या मुदतीचा लाभ घेऊन मतदार यादीतील आपली नोंद
१२


रायगड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत भारत निवडणूक आयोगाने १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. मतदारांनी या मुदतीचा लाभ घेऊन मतदार यादीतील आपली नोंद तपासावी आणि आवश्यक असल्यास दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करून विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत १३ नोव्हेंबर असून, त्यावरील नोटीस प्रक्रिया पूर्ण करून प्रकरणे निकाली काढण्याची मुदत २५ नोव्हेंबरपर्यंत आहे. अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदारांना आपले नाव भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टल तसेच मतदार शोध पोर्टल आणि ECINET ॲपवर तपासता येणार आहे. electoralsearch.eci.gov.in तसेच voters.eci.gov.in किंवा ECINET APP वर आपले नाव तपासावे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र (ceo.maharashtra.gov.in) तसेच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध मतदार यादीची पडताळणी करता येईल. याकरिता जिल्ह्यांची संकेतस्थळे याप्रमाणे आहेत.

https://thane.nic.in, https://ratnagiri.gov.in, https://palghar.gov.in, https://raigad.gov.in, https://sindhudurg.nic.in, https://mumbaicity.gov.in, https://mumbaisuburban.gov.in. याशिवाय मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर तसेच संबंधित जिल्ह्यांच्या निवडणूक विभागाच्या संकेतस्थळांवर मतदार यादी उपलब्ध आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ) यांच्या कार्यालयातूनही मतदार यादीबाबत माहिती घेता येईल. प्रारूप मतदार यादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशील तपासून त्रुटी असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande