
नांदेड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, दि. 1 नोव्हेंबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवारी दुपारी 1 वाजता मुंबई विमानतळ येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण होईल. दुपारी 1.45 वाजता नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते मोटारीने वाडी (बु.) येथे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता उपजिल्हा रुग्णालय, वाडी (बु.) येथे आयोजित नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्यास ते उपस्थित राहतील.
या कार्यक्रमात नवनिर्मित 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे लोकार्पण, जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चारा वाटप, दुष्काळग्रस्त भागात टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा शुभारंभ, गरजू महिलांना शिलाई यंत्रांचे आणि विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis