
लातूर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
लातूर शहरात कुरिअरचे साहित्य वाहनातून खाली उतरवले जात असताना अचानक स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्फोट नेमका कशामुळे झाला, कुरिअरमधील कोणत्या वस्तूमुळे हा प्रकार घडला आणि जखमीची प्रकृती कशी आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis